Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात येवून विदेशी महिलेने मांडीवर काढला असा टॅटू; राज्यात संतापाची लाट, लोक रस्त्यावर

भारतात येवून विदेशी महिलेने मांडीवर काढला असा टॅटू; राज्यात संतापाची लाट, लोक रस्त्यावर
 

ओडिशामध्ये एका विदेशी महिलेनं आपल्या मांडीवर भगवान जगन्नाथ यांचा टॅटू बनवला आहे. या टॅटूमुळे संपूर्ण ओडिशामध्ये सध्या संतापाची लाट आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, या महिलेनं भुवनेश्वर येथील एका पार्लरमध्ये आपल्या मांडीवर हा टॅटू बनवला आहे. त्यानंतर या महिलेनं या टॅटूचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून,याविरोधात भगवान जगन्नाथ यांचे भक्त रस्त्यावर उतरले आहेत. जोरदार आंदोलन सुरू आहे.

पुढे बोलताना या अधिकाऱ्यानं म्हटलं की ही महिला एका खासगी संस्थेसाठी भारतात काम करते. या प्रकरणात काही भक्तांनी साहिद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेविरोधात कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणूबजून एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका या महिलेवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या सुब्रत मोहानी यांनी म्हटलं की, या महिलेनं भगवान जगन्नाथ यांचा टॅटू आपल्या मांडीवर काढला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या आणि भगवान जगन्नाथ यांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. या महिलेविरोधात कडक कारवाई व्हायला पाहिजे. दरम्यान वाद वाढल्यानंतर आता या महिलेनं आणि तिच्या मांडीवर टॅटू काढणाऱ्या व्यक्तीनं सोशल मीडियावर या संदर्भात माफी मागितली आहे.

या महिलेनं आपल्या माफीचा एक व्हिडीओ तयार केला आहे, ज्यामध्ये तीनं म्हटलं आहे की, माझा उद्देश हा भगवान जगन्नाथ यांचा अपमान करण्याचा नव्हता. मी देखील भगवान जगन्नाथ यांची भक्त आहे. मी दररोज मंदिरात जाते. माझ्याकडून चूक झाली आणि त्यांच मला दु :ख आहे. मी फक्त ज्याने टॅटू काढला त्याला एवढंच म्हटलं होतं की टॅटू अशा जागी बनव जिथे तो दिसणार नाही. माझी चूक झाली मी हा टॅटू हटवणार आहे. मला माफ करा, असं या महिलेनं म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.