धनंजय मुंडे जे काही वागत आहे ते दुर्दैवी आहे. त्यांनी शहाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे जीवन चरित्र, मराठ्यांचा इतिहास वाचावा. देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर
पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दहावी पर्यंत सक्तीचा केला पाहजेल. संस्कृत
भाषा सक्तीची केली पाहीजे, आणि हे करत असताना शासनही तसं पाहिजे. मुळात
आनंदाची गोष्ट एवढीच आहे, आताचं शासन आहे ते त्रिमूर्ती असलेले सरकार आहे.
त्यांची बुद्धी चळणार नाही याची खात्री मला आहे. ती विकृत होणार नाही, याची
देखील खात्री मला आहे. देशहित बुद्धीने ते तिघेजण एकवटून काम करत आहे, ही
एक जमेची बाजू आहे.
सध्या मराठे सुध्दा संकुचित वागत आहेत, आरक्षण मागत आहेत, मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, देश चालवायाचा आहे , सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी ज्या समाजाची आहे तो मराठा समाज आहे. मराठ्यांना आपण कोण आहे हे कळत नाही हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं तर हे देशाचं कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नसल्याची प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्या संदर्भात भाष्य करताना ते बोलत होते.
घरपट्टीच्या विषयात संभाजी भिडे यांची उडी
दरम्यान, सांगली महापालिका क्षेत्रातील घरपट्टीचा विषयात संभाजी भिडे यांनी उडी घेत भाष्य केलं आहे. घरपट्टी का वाढली हे आधी स्पष्ट करायला हवे. केवळ घरपट्टीबद्दल ही अस्वस्थता आहे का? आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड अवस्थता आहे. घरपट्टी सारखे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत. 72 वॉर्डामध्ये जाणत्या लोकांच्या, माजी नगरसेवकाच्या सभा व्हायला हव्यात. ज्यांनी घरपट्टी वाढवली ते काही शहराचे शत्रू नाहीत, शहराच्या विकासासाठीच ही वाढ केली असावी. शेरीनाल्याचे भुत महापालिकेच्या कित्येक वर्षे मानगुटीवर बसलेय.असेही संभाजी भिडे म्हणाले.
बलात्कार विषयावर विधानसभेचा वेळ वाया घालवू नका- संभाजी भिडे
बलात्कार हा सत्ताधारी आणि विरोधकांनाही नकोय. बलात्कार विषयावर विधानसभेचा वेळ वाया घालवू नये, बलात्काऱ्याला जिथे घावेल तिथं ठार मारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे म्हणत संभाजी भिडे यांनी राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर भाष्य करत आक्रमक भूमिका मांडली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.