Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन केला विचका, कवी संमेलनाचे भव्य आयोजन:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन केला विचका, कवी संमेलनाचे भव्य आयोजन-:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त व स्व.खा.डी जी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी स्व.खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष,प्रवक्ते मा.संतोष पाटील यांचा नियोजना खाली भव्य कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी बोलताना प्रवक्ते मा.संतोष पाटील म्हणाले की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातच होणे गरजेचे होतं कारण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तसेच सांगली जिल्ह्यातील जत सारख्या काही गावांमध्ये आजही मराठी शाळाच नाहीत त्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत कन्नड शाळेला आमचा विरोध नाही परंतु मातृभाषा असलेल्या मराठी भाषेच्या शाळाच नाहीत यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.अशा भागांमध्ये साहित्य संमेलन होणे गरजेचे होतं कारण जत हा कर्नाटकाच्या बॉर्डरवरअसणारा तालुका आहे.

आणि या भागातच सीमावाद चालू आहे तो ही सीमावाद काही अंशी सुटला असता, परंतु राज्य आणि केंद्र सरकारने  हिंदी भाषिक असलेल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेऊन त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूने करून त्या मराठी साहित्य संमेलनाचा विचकाच केला असे एकंदरीत दिसून आले.पुढे म्हणाले की या वेळच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.तारा भवाळकर ह्या सांगलीच्याच होत्या, परंतु त्या विचारवंत लेखिका, साहित्यिका आणि निष्पाप कोणालाही विरोध न करणाऱ्या असा त्यांचा स्वभाव यांच्या स्वभावाचा फायदा घेऊनच राजकीय नेते मंडळींनी केलेली भाषा ही महाराष्ट्राला शोभणारी नव्हती व ती कोणाच्या सांगण्यावरून केली का असाही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे म्हणजेच याचा वापर केंद्रातील आणि राज्यातील सरकारमधील काही लोकांनी आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्याच्या हेतू साठीच हे साहित्य संमेलन दिल्लीत घेतले याचीही चर्चा होऊ लागली आहे .त्यामुळे अशा साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीने खूप खोलवर जाऊन टीका करावी असे वक्तव्य प्रवक्ते मा. संतोष पाटील यांनी सर्व आलेल्या कवींना केले.या वेळेला कवी मा.अभिजीत पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला. या वेळेला कवी संमेलनाचे अध्यक्ष मा.आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे मा.संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवीना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.
व त्यांनी आपल्या कविता सादर करून समाजामध्ये जे सध्या वास्तववादी चित्रआहे याचे कवितेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर सादरीकरण केले.या वेळेला प्रेक्षकांनी यांना टाळ्या वाजवून दाद दिली. या वेळेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी,कवयित्री यांनी भारदार कविता सादर केल्या.यामध्ये दयासागर बन्ने ,रमजान मुल्ला,आनंद जाधव,राम सुतार,शाहीर पाटील, प्रकाश वायदंडे,मोहन राजमाने, तानाजी राजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या वेळेला पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी जाधव यांनी मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाचे आभार मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.