मिरज :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा आदर -सन्मान राखणारे मानवतावादी प्रगतिशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी सहा. गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके, उद्घाटक ए. डी. पाटील, स्वागताध्यक्ष आधार जेष्ठ नागरिक संस्थेचे अंजुमन खान व गीतांजली पाटील होते.
मिरज पंचायत समिती, आधार जेष्ठ नागरिक संस्था व भीमागण महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देश राज्यपातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटक सहकार तज्ञ ए. डी. पाटील यांनी "महिलांनी कालबाह्य झालेल्या कर्मकांडात अडकवणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरांचे चिकित्सा करून, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावे! असे आवाहन केले. सहा. गट विकास अधिकारी मडके यांनी स्त्रि- पुरुष हे समान असून, त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोननिर्माण झाला पाहिजे. तसेच गीतांजली पाटील व पुरुष हक्क समितीचे एड. बाळासाहेब पाटील यांनी अन्याय करणारे पुरुष अथवा महिला नसून ती वाईट प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण करावी. असे मनोगत व्यक्त केले.यावेळी 40 महिलांचा आदर- सन्मान करणाऱ्या पुरुषांचा. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेखा शेख, डॉ.गुलाब मालगावे, जालिंदर महाडिक, सदाशिव पवार,सुधीर नाईक, श्रीमती चेतनादेवी खुरपे, गीतांजली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळीश्रीमती उत्तरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन पुणे कार्यकर्ते, अधीक्षक नेहा सभासद, दीपक ढवळे, राजेश ढोबळे, राजेश, साळुंखे, प्रमोद माळी, आयुब सुतार,चंद्रकांत माळी, प्रदीप पाटील, वसंतराव खांडेकर, डी. बी. पाटील, वसंत दळवी, यशवंत जगताप, त्रिशला पाटील, हजरतअली सोनीकर, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी स्त्रि- पुरुष समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.