देऊळगाव राजा : अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला दारू विक्रेत्याने लाथ मारल्याने पोलिसांची दुचाकी झाडावर आढळून झालेल्या अपघातात आज (ता.२३) एक पोलिस कर्मचारी जागी ठार तर हेडकॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याची घटना शेळगाव आटोळ शिवारात घडली.
दरम्यान पोलिसांनी अवैध दारू माफियाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील अवैध दारू माफिया संजय उत्तम शिवणकर हा दुचाकी वर अवैध दारूचे बॉक्स घेऊन जाताना पोलिसांना दिसले. यावेळी बीट जमादार रामेश्वर अवचितराव आंधळे आणि पोलिस कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी यांनी अवैध दारू विक्रेत्याच्या दुचाकीचा सिनेस्टाईल पाठलाग केला.
पोलिस हे आपल्या जवळ आल्याचे पाहून अवैध दारू विक्रेत्याने चालत्या दुचाकी वरून पाठलाग करणाऱ्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलिसांची दुचाकी वरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेवर एका झाडावर आढळली. हा अपघात एवढा गंभीर होता की डोक्याला गंभीर मार लागून भागवत गिरी वय ३० या पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी बीट जमादार रामेश्वर आंधळे यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी अवैध दारू विक्रेता संजय उत्तम शिवणकर राहणार शिनगाव जहागीर यास अटक करून गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
दारू प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी कर्तव्यावर असलेले मृतक पोलिस कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी यांच्यावर आज रात्री उशिरा त्यांचे जन्मगाव पांगरी उगले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. बुलडाणा पोलिसांकडून त्यांना सलामी देण्यात येणार आहे. मृतात पोलिस कॉन्स्टेबल गिरी यांच्या पाश्चात आई-वडील पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,एक भाऊ असा आप्त परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे पांगरी उगले गावावर शोककळा पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.