सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील पेठ गावची सदैव मेरिटमध्ये उत्तीर्ण होत आलेली आणि अपार जिद्दीने शिक्षणाची वाटचाल करणारी इंजिनीयर निशिगंधा दर्शना (रेश्मा)सतीश पवार आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठली आहे! प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), मुंबई येथून एम. टेक. (स्ट्रक्चरल अभियांत्रिकी) शिक्षण पूर्ण करून तिने कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्दीचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही हातावर पोट असलेल्या कष्टकरी वडिलांनी शिक्षणाच्या महत्त्वाची जाण ठेवत इंजिनीयर निशिगंधाला सतत प्रोत्साहित केले. पण हे यश सोपे नव्हते. इंजिनीयर निशिगंधाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपल्या जिद्द, कष्ट आणि हुशारीच्या जोरावर आज हे तिच्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले आहे.
इंजिनीयर निशिगंधास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष आणि विचार हे प्रेरणास्थान ठरले. बाबासाहेबांनी दिलेला "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा संदेश तिने तंतोतंत अमलात आणला. *वास्तविक पाहता संघर्ष करीत निशिगंधने एम.टेक. केले आहे आणि शिक्षणाच्या बळावर स्वतःसाठी नवे दार खुले केले आहे.* आज समाजातील प्रत्येक मेहनती, जिद्दी तरुण-तरुणीसाठी इंजिनीयर निशिगंधा प्रेरणा बनली असल्याने निशिगंधाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.