कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील अप्पर अधीक्षक जयश्री देसाई यांची सोमवारी बदली झाली. या रिक्त पदावर अमरावती (ग्रामीण)चे अप्पर अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देसाई यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. जयश्री देसाई यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापूर पोलिस दलात अप्पर पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या पदावर धीरजकुमार बच्चू यांची नियुक्ती झाली आहे.धीरजकुमार बच्चू हे मूळचे तेलंगणा (हैदराबाद) येथील असून 2012 मध्ये त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन केली. 2022 मध्ये काही काळ त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची अमरावती (ग्रामीण) येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.