भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या ललित मोदींची अवस्था 'ना घर का, ना घाट का', वानुआतूच्या पंतप्रधानांनी दिला दणका
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना भारताचं नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केलाय. त्याआधी त्यांना वानुआतू देशाचं नागरिकत्व घेतलं. पण आता वानुआतू देशाच्या पंतप्रधानांनी ललित मोदींना मोठा धक्का दिलाय. यामुळे ललित मोदींची अवस्था ना घर का ना
घाट का अशी झालीय. वानुआतूच्या पंतप्रधानांनी ललित मोदींचं नागरिकत्व रद्द
करण्याचे आदेश दिल्यानं आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत
वानुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदींचा पासपोर्ट तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नापत यांनी सांगितलं की, मी नागरिकत्व आयोगाला आदेश दिलाय की ललित मोदींचा वानुआतूचा पासपोर्ट तात्काळ रद्द करावा. गेल्या २४ तासात मला इंटरपोलने माहिती दिली की, ललित मोदींनी भारत सरकारकडून पाठवलेली अलर्ट नोटीस दोन वेळा फेटाळलीय.
पंतप्रधान नापत यांनी म्हटलं की, "वानुआतूचा पासपोर्ट असणं हा एक विशेषाधिकार आहे, तो कोणता अधिकार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी वैध कारणांनीच नागरिकत्व घ्यावं." ललित मोदी यांना सात मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पासपोर्ट सरेंडर केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही ललित मोदींनी पासपोर्ट जमा केल्याचं सांगितलं होतं. वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरातला एक लहानसा देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तो १८२ व्या क्रमांकावर आहे. इथली अर्थव्यवस्था शेती, पर्यटन आणि मासेमारीसह परदेशी वित्तीय सेवांवर आधारीत आहे. इथं गुंतवणुकीच्या आधारे नागरिकत्व मिळू शकते. पासपोर्ट विक्री हा सरकारचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.