सामाजिक कार्यकर्त्यास अटक, गृह सचिव, पोलिस महासंचालकांसह उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
जळगावातील सामाजिक कार्यकर्ते ॲड विजय भास्करराव पाटील यांना अटक केल्याच्या प्रकरणात राज्याचे गृह मंत्रालयाच्या सचिव यांना नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस दलातील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनाही उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठाने बजावली आहे.
21 मार्चपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश
जळगावातील जिल्हा पेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरुद्ध ॲड विजय भास्करराव पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात अवमान याचिका दाखल केली होती. या अवमान याचिकेवर कामकाज होऊन खंडपीठाने गृहमंत्र्यांलयाचे सचिवांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. 21 मार्चपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड विजय भास्करराव पाटील यांनी जळगावात दिली.
काय आहे प्रकरण…
जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जुना वाद प्रकरणात विजय भास्कर यांना अटक झाली होती. संस्थेवर वर्चस्वाचा हा वाद होता. या प्रकरणात जिल्हा पेठ पोलिसांनी 15 डिसेंबर 2024 रोजी ॲड विजय भास्करराव पाटील यांना अटक करण्यात आली होती. परंतु अटक करताना जिल्हा पेठ पोलिसांनी कुठली नोटीस अथवा कारण न सांगता ताब्यात घेतले. त्यानंतर तब्बल पाच तासांनी गुन्हा दाखल करून अटक दाखवली. पोलिसांनी केलेली अटक ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ॲड विजय भास्करराव पाटील यांनी याबाबत अवमान याचिका दाखल केली होती.
खोटे गुन्हे दाखल केले
राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करून मला वर्षानुवर्ष जेलमध्ये सडविण्याचा हेतू होता. हा जामनेर पॅटर्न असल्याचे म्हणत ॲड विजय पाटील यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. सामाजिक कार्यकर्ते असलेले ॲड विजय भास्करराव पाटील हे मागील काळात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घडलेल्या मोक्का प्रकरणातील तक्रारदार सुद्धा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.