Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! त्वरित कर्ज देणाऱ्या चीनी अॅप्सचा राज्यात धुमाकूळ, अनेकांची फसवणूक

सावधान! त्वरित कर्ज देणाऱ्या चीनी अॅप्सचा राज्यात धुमाकूळ, अनेकांची फसवणूक
 
 
जर मोबाईलवरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान. त्वरीत कर्ज देणाऱ्या चीनी ॲप्समुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. चीनमधील काही सायबर भामटे हे ॲप्स चालवत आहेत. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांकडून ॲप्स सुरु ठेवण्याची परवानगी मिळवून फोनमधील माहिती चोरतात. त्याचा नागरिकांना मोठा फटका बसतो आहे.

चीनी ॲप्सच्या फसवेगिरीने भारतामधील अनेक राज्यातील नागरिकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. दक्षिणेतील राज्यात काही कुटुंबांच्या आत्महत्येमागे कर्ज वसूलीसाठीची पिळवणूक समोर आली आहे. काही चीनी ॲप्सने केंद्र सरकारच्या कडक पावलामुळे आता त्यांचे धोरण बदलवले आहे. ते ग्राहकांना त्वरीत कर्ज देण्याचे आमिष दाखवत आहे. एकदा सावज जाळ्यात ओढले की, त्याची मोबाईलमधील माहिती चोरण्यात येते. त्याआधारे त्याची फसवणूक करण्यात येते.

कर्ज देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक

सध्या अशा अनेक ॲप्सचे जाळे ऑनलाईन विणण्यात आले आहे. हे फसवणूक करणारे ॲप्स बेकायदेशीररित्या काम करत आहेत. ते सर्वसामान्यांना, गरजूंना कर्जाचे आमिष दाखवत आहेत. कर्ज देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग या चीनी भामट्यांनी सुरु केला आहे. राज्यात पुणे मुंबईसह अनेक मोठ्या शहरात नागरिक या अॅप्सच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.

कर्जाच्या नावाखाली लोकांची फसवणूक
ज्यांना तात्काळ एक छोटी रक्कम हवी असते, ते या सायबर भामट्यांचे सर्वात सोप्या पद्धतीने जाळ्यात अडकतात. म्हणजे 5 ते 25 हजार रुपयांपर्यंचे कर्ज हवे असणाऱ्यांना नागरिकांना ते लक्ष करतात. असा ग्राहक टप्प्यात आल्यावर त्याला स्वस्त कर्जाचे आमिष दाखविण्यात येते. त्याच्याकडून ॲप्स चालविण्यासाठीची परवानगी घेण्यात येते. त्यानंतर युझर्सची खासगी माहिती चोरण्यात येते. त्याचे फोटो, त्याचे कॉन्टैक्ट्स, इतर माहिती चोरण्यात येते. त्याआधारे युझर्सला ब्लॅकमेल करण्यात येते. बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्यात येतात. तर काही जण बँकेचा तपशील चोरुन फसवणूक करतात.

सध्या 30 ते 35 ऑनलाइन अॅप आहे अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे कर्ज घेताना काळजी घेण्याची गरज आहे असा अहवाल पुणे सायबर सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.मेट्रो सारख्या शहरात अशा घटना दररोज वाढत चालल्या आहेत. झटपट कर्जची हमी म्हणजे जिवाला धोका हा मूलमंत्र प्रत्येकानी लक्षात ठेवला पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.