Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली सर्व माहिती

सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली सर्व माहिती
 
 
मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई  अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील  विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून यंदाच्यावर्षी केवळ इयत्ता पहिलासाठी हा पॅटर्न लागू होणार आहे. त्यामुळे, पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी आणि तिसरी, चौथीसाठी लागू करण्यात येईल. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे  यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, सीबीएससी पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे दादा भुसे यांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षीपासूनच कामकाज सुरू झाल्याची माहिती मंत्री महोदयांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी
राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या फेसमध्ये इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही जाणार आहोत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न अॅडॉप्ट करणार आहोत. पुढच्या वर्षात दोन टप्प्यांत आपण दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी पॅटर्न अॅडॉप्ट होईल. सगळ्या विद्यार्थ्यांचे बदल लगेच केले तर ते अडॉप्ट करू शकणार नाहीत. त्यामुळे, पुढच्या वर्षाच्या दोन टप्प्यांत पूर्ण शिक्षण आपण सीबीएससी पॅटर्नवर जाऊ, असे मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
मराठी असणारच, फीवाढ नाही

सीबीएससी पॅटर्नमध्ये आपल्याला 30 टक्क्यांपर्यंतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, मराठी याला प्राधान्य देण्यात येईल. त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. सीबीएससीची पुस्तकेही मराठीत तयार केली जातील. राज्यातील सर्वच शाळांना मराठी विषय बंधनकारक आहे, त्यात मराठीची डिग्री गरजेची असेल, असेही मंत्री दादा भुसे यांनी सांगितेल. तर, सीबीएससी पॅटर्न लागू केल्यामुळे कुठलीही फी वाढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सभागृहात दिले लेखी उत्तर
राज्यात शाळांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याबाबत व त्याच्या अंमलबजावणीबाबत विचार विनिमय सुरू आहे. या सगळ्या संदर्भात सुकाणू समितीकडून विचार विनिमय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी उत्तर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून आज विधानपरिषद सभागृहात देण्यात आले. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने जानेवारी 2025 मध्ये मान्यता दिली आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये विचार विनिमय करून शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न कधी राबवायचा याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.