केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या घरी हत्येचा थरार ; दोन भाच्यांचा एकमेकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी
केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या राहत्या घरी हत्येचा थरार पाहायला मिळाला. आज सकाळी राय यांच्या भाच्याला गोळी लागल्याने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील भागलपूर याठिकाणी
घडली. नवगछियाच्या परबट्टा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जगतपूरमध्ये दोन
भावांमध्ये वाद झाला, त्यानंतर वादाचे रूपांतर एकमेकांच्या जीवावर उठल्याचे
दिसले. हे दोन्ही भाऊ केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचे भाचे आहेत.
पाणी वाटपावरून झाला गोळीबार
पाणीवाटपावरुन विश्वजीत यादव आणि जयजीत यादव यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. या वादातून भावांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत विश्वजीतचा मृत्यू झाला. जयजीतलाही गोळी लागली आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत नित्यानंद राय यांची चुलत बहीणही गोळी लागून जखमी झाली. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना चीना देवीला गोळी लागली. जखमींना प्रथम उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या संपूर्ण प्रकरणात एफएसएल टीमचाही सहभाग आहे.
मृत विश्वजीतच्या पत्नीने काय म्हटले?
मृत विश्वजीत यादव यांच्या पत्नी मनीषा म्हणाल्या की, “जमिनीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज या छोट्या वादाने मोठे रूप धारण केले आहे. मनीषाने असेही सांगितले की,”जमिनीवरून हा वाद रात्रीही झाला होता. त्या रडत रडत म्हणाल्य कि मला दोन मुले आहेत. आता मी त्यांना कसं वाढवू ?” असे म्हणत त्यांनी एकच हंबरडा फोडला. मृत्युमुखी पडलेला विश्वजीत हा दोन भावांमध्ये मोठा होता. दोन्ही भावांचे वय सुमारे ३४-३५ वर्षे असेल. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. जखमी आई आणि मुलाला चांगल्या उपचारांसाठी पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे.
नवगछिया एसपी प्रेरणा कुमार म्हणाल्या की, “सकाळी आम्हाला माहिती मिळाली की जगतपूरमध्ये दोन भावांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे. परबट्ट्याचे एसएचओ घटनास्थळी पोहोचले. ज्यांना गोळ्या लागल्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. माहिती मिळताच एसडीपीओ देखील रुग्णालयात पोहोचले. एसएचओ देखील रुग्णालयात होते. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भांडणाच्या वेळी, दोन्ही भावांच्या आईने हस्तक्षेप केला आणि तिच्याही हातात गोळी लागल्याचे वृत्त आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पाण्यावरून वाद निर्माण झाल्याचे आता समोर येत आहे. त्यानंतर हे प्रकरण इतके वाढले की दोन्ही भावांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. आम्हाला रात्री ८ वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली.” अशी माहिती त्यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.