Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणेंची चौकशी

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणेंची चौकशी
 
 
जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या कार्यकाळातील काही कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार व त्यांनी परवानगी न घेता केलेल्या विदेश दौऱ्यासंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे.

त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री शिवेंद्रराज भोसले यांनी विधिमंडळात दिली. माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यात खडसेंनी प्रशांत सोनवणे यांच्यासह अभियंता प्रांजल पाटील यांनी जळगावात कार्यरत असताना केलेल्या कथित गैरव्यवहार, तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सोनवणेंनी इंग्लंडचा (युके) दौराही केला होता, या प्रकरणांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला.

मंत्री भोसलेंचे उत्तर
खडसेंनी यासंदर्भात निवेदन केल्यानंतर मंत्री भोसले यांनी त्यावर उत्तर दिले. त्या कामांच्या निविदेतील कथित अनियमिता प्रकरणी दोन्ही अभियंत्यांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंग व चौकशी सुरू आहे. दोघांनी निवेदने सादर करून यासंदर्भातील दोषारोप अमान्य केले आहेत. तरीही त्यासंदर्भातील विस्तृत चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जळगावातील ख्वाजा नाईक स्मारक बांधण्याच्या निविदेतील कथित अनियमिततेप्रकरणीही अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. शासनाच्या परवानगीशिवाय इंग्लंडचा दौरा केल्याबद्दलही शिस्तभंगाची कारवाई सुरू केली असून, अभियंता सोनवणेंची छत्रपती संभाजीनगरला बदली केल्याची माहिती मंत्र्यांनी विधिमंडळात दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.