मिरजेतील अबवाली कब्रस्तान जवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या आणि विकत घेणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली. या दोघांकडून ९६८ ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी असा एकूण ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. रियाज मेहबूब सारवान (वय ४२ रा. मंगल टॉकीज जवळ, लोणार गल्ली, मिरज) आणि
अमन अक्रम जमादार (वय २१ रा. ख्वाजा वस्ती, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे
आहेत. एलसीबीचे एक पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील
कर्मचारी अतुल माने आणि अनंत कुडाळकर यांना माहिती मिळाली कि, संशयित रियाज
सारवान हा अमन जमादार यांच्याकडून तयार गांजा घेण्यासाठी येणार आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी मिरजेतील अबवाली कब्रस्तान जवळ सापळा लावला. यावेळी रियाज याने त्याच्याकडील पैसे अमन याला देऊन त्याच्याकडून गांजा घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवला. यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २९ हजारांचा गांजा, दुचाकी असा एकूण ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा बाबत कसून चौकशी केली असता रियाज याने गांजा विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. अमन याने जयसिंगपूर येथील संशयित मोहंमद तोहीद सिद्धकी यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांना अटक करून पुढील कार्यवाहीसाठी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, अनिल ऐनापुरे, संकेत मगदूम, आमसिध्द खोत, अतूल माने, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर यांच्या पथकाने कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.