Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'डॅप्स' कार्यकारिणीच्या निवडी बिनविरोध डॉ. अविनाश पाटील अध्यक्ष, डॉ. महेश प्रभू उपाध्यक्ष

'डॅप्स' कार्यकारिणीच्या निवडी बिनविरोध डॉ. अविनाश पाटील अध्यक्ष, डॉ. महेश प्रभू उपाध्यक्ष


कोल्हापूर, ता. १८ : डेक्कन असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स (डॅप्स) ही कोल्हापूर, सांगली, मिरज, कऱ्हाड, सोलापूर, बेळगाव, हुबळी धारवाड आणि गोवा येथे कार्यरत असलेल्या शल्य विशारदांची नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड केली. सांगलीचे डॉ. अविनाश पाटील अध्यक्ष, तर कोल्हापूरचे डॉ. महेश प्रभू उपाध्यक्ष, डॉ. अर्चना पवार मानद सचिव, डॉ. अरुणकुमार देशमुख खजानीस, डॉ. मयुरेश देशपांडे कार्यकारिणी सदस्य तसेच मावळते अध्यक्ष डॉ. उद्धव पाटील, डॉ. रणजित मिरजे यांची सल्लागारपदी नियुक्ती झाली. सोलापूरचे डॉ. गुणवंत चिमनछोडे, डॉ. राहुल आंबले, डॉ. चेतन धांडोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, 'डॅप्स'च्या सोलापूर.. येथील सर्जन्सनी आयोजित केलेल्या 'डॅप्सकॉन' वार्षिक परिषदेसाठी पुणे येथील महाराष्ट्र. प्लास्टिक सर्जन्स संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीरंग पंडित, डॉ. पराग सहस्त्रबुद्धे, बंगलोर येथून डॉ. प्रशांत केसरी यांना निमंत्रित केले होते. पुनर्निर्माण शस्त्रक्रिया, मायक्रोसर्जरी, फॅट सक्शनिंग, एंडोस्कोपीतून फेस लिफ्ट, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर सहभागी सर्जन्सनी सादरीकरण-केले. 'डॅप्स'चे संस्थापक... अध्यक्ष डॉ. उद्धव पाटील यांनी स्वागत केले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.