Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तान चे सैन्य हादरले; सामूहिक राजीनामे देण्याचे सत्र सुरु

पाकिस्तान चे सैन्य हादरले; सामूहिक राजीनामे देण्याचे सत्र सुरु
 

पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानला पळता भुई थोडी करून ठेवले आहे. मागील आठवड्यात एका मागोमाग एक आत्मघातकी हल्ले करून पाकिस्तानी सैन्याचे शिरकांड सुरु केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे  सैन्य पुरते घाबरले आहे. त्यांनी सैन्याची नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला असून सैन्य सामूहिक राजीनामे देऊ लागले आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मागील आठवड्यात चार हल्ले केले आहेत. शेवटच्या हल्ल्यात तर ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. यामुळे सैनिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा परिणाम पाकिस्तानी  सैन्याच्या मनोधैर्यावर होत असून, या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत असलेली असुरक्षितता, सातत्याने सैनिकांचे जात असलेले बळी आणि पाकिस्तानची ढासळत असलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानमध्ये आपला जीव धोक्यात घालण्याऐवजी सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयक्त अरब अमिरातीमध्ये काम करण्याचा पर्याय निवडत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.