Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

30 विद्यार्थिनी, 65 अश्लील व्हिडीओ अन् 54 वर्षांचा प्राध्यापक! पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं प्रकरण

30 विद्यार्थिनी, 65 अश्लील व्हिडीओ अन् 54 वर्षांचा प्राध्यापक! पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं प्रकरण
 

महाविद्यालय हे विद्याचे मंदिर असते. येथे शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात आणि नवी पिढी घडवतात. मात्र, याच विद्येच्या मंदिरात एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. एका प्राध्यपकाने तब्बल 30 पेक्षा जास्त विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या शिक्षकाच्या मोबाईलमध्ये 65 अश्लील व्हिडीओ सापडले आहे. इतकचं नाही तर हे अश्लिल व्हिडिओ प्राध्यापकाने पॉर्न साईटवर अपलोड केल्याचाही आरोप केला जात आहे. हे प्रकरण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं आहे. उत्तर प्रदेशात हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

6 मार्च रोजी एका विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवले. या पत्रासोबत विद्यार्थ्यीनीने प्राध्यापकांच्या घृणास्पद कृत्यांचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पाठवले. विद्यार्थीनीने या प्रकरणात मदत मागितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. डॉ. रजनीश कुमार असे या प्राध्यापकाचे नाव आहे. रजनीश कुमार सेठ पी.सी. बागला डिग्री कॉलेजचे भूगोल प्राध्यापक आणि मुख्य प्रॉक्टर आहे. रजनीश कुमार विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत आहे. तो मुलींना परीक्षा आणि नोकरीत चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात अडकवायचा. नकार देणाऱ्या विद्यार्थींना तो धमक्या द्यायचा. गेल्या एका वर्षात अनेक ठिकाणी तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. आता मला असुरक्षित वाटते आणि कधीकधी मला आत्महत्या करावीशी वाटते. महाविद्यालय प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, असेही विद्यार्थ्याीने पत्रात नमूद केले आहे.
विद्यार्थीनीच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत महिला आयोगाने तात्काळ प्राध्यपकाची चौकशी करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार पोलिसांनी प्राध्यापक रजनीश याची चौकशी केली तेव्हा त्यांचा मोबाईल फोन तपासण्यात आला. आधीच डेटा डिलीट केला होता. पोलिसांनी मोबाईल डेटा जप्त केला तेव्हा 65 अश्लील व्हिडिओ सापडले. यानंतर 13 मार्च रोजी हाथरस गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
18 महिन्यांत 5 तक्रारी आल्या पण कारवाई झाली नाही. मागील 18 महिन्यांत विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनाकडे 5 वेळा तक्रार केली होती परंतु प्रत्येक वेळी प्रकरण दाबण्यात आले. या गुन्ह्यात कॉलेज व्यवस्थापनाचाही सहभाग असू शकतो, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. 30 मुली तक्रार करण्यासाठी पुढे आल्या असल्या तरी प्रत्यक्षात या प्राध्यापकाने 30 पेक्षा जास्त विद्यार्थीनींचे शोषण केल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास करण्याासाठी राहुल पांडे यांनी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. एसडीएम सदर, सीओ सिटी, तहसीलदार सादाबाद आणि जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर प्राध्यापकावर कठोर कारवाई केली जाईल, असे डीएम म्हणाले. प्राध्यापक रजनीश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसपी चिरंजीव नाथ सिन्हा यांनी सांगितले. आरोपी प्राध्यापक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
प्राध्यापकाला अटक करण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयीन प्रशासन आणि शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक प्राध्यापक 20 वर्षे महिला विद्यार्थ्यांचे शोषण कसे करू शकतो आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.