Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यूट्यूब पाहून स्वतःवरच केली शस्त्रक्रिया! पोट कापल्यानंतर हात घालून पाहिले, नंतर शिवलेसुद्धा!

यूट्यूब पाहून स्वतःवरच केली शस्त्रक्रिया! पोट कापल्यानंतर हात घालून पाहिले, नंतर शिवलेसुद्धा!
 

मथुरा : मथुरा येथे पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने यूट्यूब पाहून ऑपरेशनची पद्धत शिकली, इंटरनेटवर भूल देण्याच्या इंजेक्शनबद्दल वाचले आणि स्वतःवर स्वतःच शस्त्रक्रिया करण्याचा अघोरी प्रयत्न करत सर्वांनाच आश्चर्याचा जबरदस्त धक्का दिला. अर्थातच, याचा काहीही उपयोग न होता त्याच्या वेदनांत आणखी भरच पडली आणि त्यानंतर त्याला तातडीने इस्पितळात दाखल करावे लागले आहे. राजाबाबू असे या तरुणाचे नाव असून, वृंदावनच्या सुनरख गावातील तो रहिवासी आहे. त्याने बीबीएचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो शेती करतो.

या तरुणाने स्वतःच्या पोटातील दुखणाऱ्या ठिकाणी ब्लेडने ७ सेंमीचा चिरा दिला; मग त्यात हात घालून पाहिले. पण, जेव्हा काहीच समजले नाही तेव्हा त्याने सुई आणि धाग्याने ते स्वतः शिवले; पण काही तासांनी त्याची तब्येत बिघडू लागली, म्हणून त्याने हे त्याच्या पुतण्याला सांगितले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शन, सर्जिकल ब्लेड आणि औषधे आणत त्याने केलेला हा प्रकार वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक ठरला. पुतण्याने त्याला कम्बाईंड हॉस्पिटलमध्ये नेले. 
 
जेव्हा संपूर्ण प्रकरण डॉक्टरांना सांगितले, तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, १८ वर्षांपूर्वी माझे अपेंडिक्स ऑपरेशन झाले होते; पण गेल्या काही दिवसांपासून मला पुन्हा पोटात दुखू लागले. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला; पण आराम मिळाला नाही. मंगळवारी रात्री वेदना अधिक तीव्र झाल्या. यानंतर मी यूट्यूबवर ऑपरेशनचे व्हिडीओ पाहिले, प्रथम एक इंजेक्शन घेतले, नंतर जिथे वेदना होत होत्या ती जागा ब्लेडने कापली. यानंतर, जेव्हा मला काहीही समजले नाही, तेव्हा मी सुई आणि धाग्याने माझे पोट शिवले. नंतर, जेव्हा कुटुंबीयांना कळवले, तेव्हा त्यांनी रुग्णालयात नेले.
डॉ. शशी रंजनजॉईंट हॉस्पिटलजेव्हा तो तरुण आला तेव्हा त्याची प्रकृती चांगली नव्हती. त्याने स्वतःच्या हातांनी पोटात सात सेंटिमीटरचा चिरा केला. तसेच, प्लास्टिकच्या धाग्याने ११ टाके बनवण्यात आले. यामुळे त्याच्या पोटात संसर्गही पसरला असावा. सध्या त्याला आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.