भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. या महिलेला 1 कोटी खंडणीची रक्कम
स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने
केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरणी मिटवण्यासाठी या महिलेने तब्बल
3 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
तर या महिलेला ही खंडणी स्वीकारताना
सातारा पोलिसांनी अटक केली असून पोलिसांकडून या महिलेची आता कसून तपासणी
सुरू आहे. याच महिलेने मंत्री गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या
प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात गाजला होता. विरोधकांनी या प्रकरणी गोरे
यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, आता आरोप करणाऱ्या महिलेनेच
हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याचं उघडकीस आलं आहे.
महिलेने काय केले होते आरोप?
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली होती. मंत्री गोरे यांनी आपल्याला त्यांचे नग्न फोटो पाठवल्याचा दावा या महिलेने केला होता. तर हे प्रकरण 2019 साली मिटले होते. मात्र, गोरे मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा या महिलेला त्रास द्यायला सुरू केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.