पुणे :- शहरातील अलका टॉकीज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जात असताना वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद
पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली
आहे. हा निर्दयीपणा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे सांगत
त्यांनी व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी अशी
विनंती राज्य सरकारला केली आहे.
काल (दि.२३) सायंकाळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस गणेश कला सभागृहात सहकार विभागाच्या कार्यक्रमाला जाताना
अलका चौकामधून गाड्यांचा ताफा गेला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी
रुग्णवाहिकेला थांबून ठेवले. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला
होता. त्यावरून जगताप यांनी व्हिडिओ ट्विट करत निशाणा साधला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, ' २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. याठिकाणी आम्ही लाल दिव्याची गाडी बंद करत आहोत. अशी गर्जना त्यांनी केली. पण त्याच्यानंतर व्हीआयपी कल्चर बंद झालेले दिसले नाही. शेवटी हा त्या सरकरचा निर्णय आहे. पण त्या कल्चरमध्ये सर्वसामान्यांचे जिणं अवघड होऊ नये. एवढीच आमची आर्त मागणी आहे.काल पुण्यात मोदी सरकारचे शिष्य देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जाण्याकरिता वेगवगेळ्या भागातून वाहतूक कोंडी करण्यात आली. ज्यामध्ये अलका चौकात रुग्णवाहिका थांबवून ठेवली. हा निर्दयीपणाचा एकूणच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्यांनी त्यांचे व्हीआयपी कल्चर जपावे. फक्त यामुळे कोणत्याही पुणेकरांचा जीव जाऊ नये याची काळजी घ्यावी. एवढीच त्यांना हात जोडून विनंती आहे. कृपया या व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणूक थांबवावी हीच नम्र विनंती', असे जगताप यांनी म्हंटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.