मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवितेवरून राज्यात एकच गदारोळ सुरू झाला आहे. विधिमंडळात देखील कामरावरून विरोधक आणि सत्ताताधारी आमने-सामने आले आहे.
कुणाल कामरा काहीही चुकीचे बोलला नाही, असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची पाठराखण केली आहे. यातच पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधला आहे. तेव्हा, "एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानाच पश्चाताप होत नाही," असे कुणाल कामराने पोलिसांना म्हटले आहे. याबद्दल एका इंग्रजी संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
सुपारी घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते. पण, 'कुणाचीही सुपारी घेऊन एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले नाही,' असे कुणाल कामराने पोलिसांजवळ स्पष्ट केले आहे. मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू पोलिसांना बोलताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधकांनी पैसे दिल्याच्या अफवांचे खंडन केले. गरज पडल्यास आर्थिक व्यवहार तपासण्याची परवानगी कामराने दिली आहे. जेणेकरून कुणाकडून पैसे मिळाले का? याचा तपास करता येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.