मिरजेत तीन किलो गांजा जप्त; एकाला अटक
मिरज : मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक केली. विशाल भारत देवकुळे (वय ३७, रा. चाँद कॉलनी, मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला. महिनाभरात गांजाविरोधात पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे.
याबाबत माहिती अशी की, नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थ विक्री व वितरण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला अमली पदार्थांचीतस्करी रोखण्याची सूचना केली. या पथकातील अधिकारी व अंमलदारांना विशाल देवकुळे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील बोळात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने शिताफीने देवकुळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ किलो गांजा मिळून आला. संशयित देवकुळे हा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात गांजा विक्री करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.