जनसुराज्य युवाशक्तीकडून सामान्यांना न्याय
मिरज, ता. ११: जनसुराज्य युवाशक्ती पक्ष सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देणारा म्हणून सर्वदूर परिचित असल्यामुळेच पक्षात प्रवेशासाठी रीघ लागल्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक युवकांनी जनसुराज्य पक्षात आज पक्षप्रवेश केला. कवठेमहांकाळचे रमेश खोत, मिरजेचे आदित्य साळुंखे यांनी कदम यांच्या उपस्थितीत त्यांचे नेतृत्व स्वीकारले. कार्यकत्यांसह अनेकांनी जनसुराज्य युवाशक्ती पक्षात प्रवेश केला. खोत म्हणाले, "जिल्ह्यात कदम यांच्या रुपाने एक तरुण आश्वासक नेता मिळाला आहे.
अनेक विकास कामे मार्गी लावलीत. राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुका आहे. उद्योग, विकासासाठी समित कदम यांच्या पाठीशी राहू." साळुंखे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू, असे सांगितले. डॉ. महादेव कुरणे, मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव, सुशील माळी, बंडू रुईकर, अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण घेडे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.