पण टेलिव्हिजनवर रिलीज झाल्यावर हा सिनेमा अतिशय यशस्वी ठरला. टेलिव्हिजनवर सगळ्यात जास्त पहिल्या गेलेल्या सिनेमांपैकी हा सिनेमा आहे. याच सिनेमातील प्रत्येक पात्र हिट ठरलं. यात काम करणाऱ्या साऊथ इंडस्ट्रीमधील दिवंगत अभिनेत्री सौंदर्या यांच्या मृत्यूप्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. सूर्यवंशम हा तामिळ सिनेमाचा रिमेक
होता. त्यांनी हिरा ठाकूर आणि भानुप्रताप सिंह ही दुहेरी भूमिका साकारलेली.
तर सौंदर्य यांनी राधा ही भूमिका साकारली होती. सौंदर्या यांनी साकारलेली
ही भूमिका सुपरहिट ठरली होती. 17 एप्रिल 2004 ला सौंदर्या यांचं वयाच्या 31
व्या वर्षी विमान अपघातात निधन झालं. पण आता 22 वर्षांनी तिच्या
मृत्यूबाबत नवीन खुलासा केला आहे.
सौंदर्या यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या गर्भवती होत्या असा दावा केला जातोय. या प्रकरणी टॉलीवूड्चे ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सौंदर्याचा मृत्यू अपघाताने नाही तर तिचा खून करण्यात आला आहे.सौंदर्या 17 एप्रिल 2004 ला करीमनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलुगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी त्यांचा आणि त्यांच्या भावाचा विमान अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नव्हता. त्यानंतर आता तब्बल 22 वर्षांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या बातमीनुसार, मोहन बाबुसोबतच्या मालमत्तेच्या वादातून सौंदर्याचा खून करण्यात आला आहे. मोहन बाबू यांनी भावंडांवर जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. तर विमान अपघातानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावल्याचा आरोपही तक्रार करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचे चित्तमुल्ला असं आहे.
एवढंच नाही तर तक्रारदाराने मांचू मनोजला न्याय देण्याची मागणी केली आहे, तर जलपल्ली येथे 6 एकरच्या जागेत बांधलेलं अतिथीगृह जप्त करण्याची मागणी त्यांनी जेली आहे. तर मोहन बाबूमुळे जीवाला धोका असून तक्रारदाराने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान याबाबत मोहन बाबू यांच्याकडून अजून कोणतंही वक्तव्य केलं नाहीये. त्यामुळे मोहन बाबू काय पाऊल उचलणार याकडे चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
कोण होत्या सौंदर्या ?
सौंदर्या यांचं खरं नाव सौम्या सत्यनारायण असं होतं. त्या कन्नड अभिनेत्री होत्या पण त्यांचं तामिळ आणि तेलगू भाषांवरही प्रभुत्व होतं. त्यांनी MBBS चं शिक्षण घेतलं होतं. 1999मध्ये सूर्यवंशम सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अवघ्या बारा वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 100 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्या त्या काळातील कदाचित एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांनी तामिळ,तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये सिनेमे केले होते. त्यांनी जीएस रघुबरोबर लग्न पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.