Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धार्मिक भावना दुखावल्या; भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार

धार्मिक भावना दुखावल्या; भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार


भाजपच्या खासदार आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पुरी जगन्नाथ मंदिरात येऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिरातील व्हिडीओ समोर आल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. हेमा मालिनी यांनी मंदिरात केलेला प्रवेश बेकायदेशीर आहे, असा आरोप पुरीच्या स्थानिक संघटनेने केला आहे.

 
सिंहद्वार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत हेमा मालिनी यांनी धार्मिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. संघटनेने आरोप केला आहे की, हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्र यांनी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि त्यांचे लग्नदेखील मुस्लिम रीतिरिवाजांनुसार झाले होते. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना 4 मुले आहेत. 1955 च्या हिंदू कायदा कायद्यानुसार, कोणत्याही हिंदूला दोनदा लग्न करण्याची परवानगी नाही.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.