Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी सरकारचं खासदारांना मोठं गिफ्ट; पगार, भत्ता, पेन्शन सगळंच वाढवलं; वाढलेले आकडे पाहा

मोदी सरकारचं खासदारांना मोठं गिफ्ट; पगार, भत्ता, पेन्शन सगळंच वाढवलं; वाढलेले आकडे पाहा
 

देशातील खासदारांना मोदी सरकारने एक मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी (२४ मार्च) खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर केली. १ एप्रिल २०२५ पासून खासदारांना १ लाख रुपयांऐवजी १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहे.

खासदारांना काय-काय मिळतं?

देशातील खासदारांना २०१८ पासून १ लाख रुपये प्रति महिना पगार निश्चित करण्यात आला होता. याशिवाय मतदारसंघात कार्यालय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी ७०,००० रुपये भत्ता दिला जात होता. याशिवाय त्यांना कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६० हजार रुपये आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान दररोज २ हजार रुपये भत्ता मिळत होता. याशिवाय दरवर्षी फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी भत्ता देखील मिळतो.

विमान प्रवासही असतो मोफत
ते स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वर्षातून ३४ मोफत देशांतर्गत विमान प्रवास करू शकतात. ते कामासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी कधीही प्रथम श्रेणीत रेल्वेने प्रवास करू शकतात. रस्त्याने प्रवास केल्यास त्यांना इंधन खर्चही मिळतो. खासदारांना दरवर्षी ५० हजार युनिट वीज आणि ४ हजार किलोलिटर पाणी मोफत मिळते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही सरकारकडूनच केली जाते. खासदारांना दिल्लीत ५ वर्षांसाठी भाडेमुक्त घर मिळण्याबरोबरच त्यांच्या ज्येष्ठतेनुसार अपार्टमेंट किंवा बंगले मिळू शकतात. जे खासदार सरकारी घरे घेत नाहीत त्यांना दरमहा घर भत्ता दिला जातो.
मोदी सकारने काय दिलंय?

केंद्र सरकारने सोमवारी खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर केली. १ एप्रिल २०२५ पासून खासदारांना १ लाख रुपयांऐवजी १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहे.

पेन्शन किती मिळणार?
खासदारांना घसघशीत पगार वाढ देण्यासोबतच मोदी सरकारने पेन्शन आणि भत्त्यातही वाढ केली आहे. त्यानुसार या निर्णयापूर्वी ज्या खासदारांचे पेन्शन २५,००० रुपये होते, ते आता ३१,००० रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दोनदा किंवा तीन वेळा खासदार राहिलेल्यांचे अतिरिक्त पेन्शन २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.