Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यात पहिल्यांदाच एचआयव्ही पॉझिटिव्ह 20 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया

राज्यात पहिल्यांदाच एचआयव्ही पॉझिटिव्ह 20 रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया
 

धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात मोतिबिंदू जनजागृती, उपचार अभियान नुकतेच संपन्न झाले. या अभियानांतर्गत एचआयव्ही बाधित २० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मुकर्रम खान, डॉ. मुकेश सैनी यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

11 वर्षीय बालिकेवरही यशस्वी शस्त्रक्रिया

राज्य शासनातर्फे १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या रुग्णांपैकी एक रुग्ण क्षयबाधित होता, तर ११ वर्षीय बालिकेवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. एका महिला रुग्णाचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता, दुसऱ्या डोळ्यास मोतिबिंदू झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे डॉ. खान यांनी सांगितले.

या रुग्णांवर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, डॉ. माया वसईकर, डॉ. अमिता रानडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. खान, डॉ. सैनी यांच्यासह डॉ. आस्मा फरहीन, डॉ. जिवांक्षा पोवार, डॉ. निकिता वसावे, डॉ. अंकिता पटेल, डॉ. विनोद धूत, डॉ. अमोल घुले, डॉ. निकिता इंगोले, डॉ. आदिती कासट, डॉ. अनंत मांडवे, डॉ. आयशा शेख यांनी औषधोपचार केले. त्यांना अधिसेविका अरुणा भराडे, साधना पाडवी, प्रवीण माळी, अतुल आगमकर, नीलेश वाडेकर, पुष्पा कुवर, नीलम धूम, विलास गावित, नम्रता वळवी, अक्षय माळी, रुकसाना शेख यांनी सहकार्य केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी पापळकर यांनी समाधान व्यक्त करून कोणताही रुग्ण औषधोपचाराविना राहू नये, सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक सुकर होण्यासाठी नियोजन रुग्णालयाने करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.