घराचं स्वप्न पूर्ण होणार! पंतप्रधान आवास योजनेतील 3 अटी रद्द; 10 निकषांवर मिळणार घर आणि 1.20 लाखांची मदत
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सरकारने ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, विशेषतः गरजू आणि गरीब कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभ घेण्यासाठी 13 निकष आवश्यक होते, मात्र आता ही संख्या कमी करून 10 करण्यात आली आहे. यामुळे अनेक जण जे पूर्वी अपात्र होते, आता ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर, मासिक उत्पन्नाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे, जे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
या योजनेच्या अंतर्गत 2011 मधील सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील निकषांवर पात्रता ठरवली जात होती. यामध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपये होती आणि अनेक सामाजिक, आर्थिक निकषांची पूर्तता आवश्यक होती. या निकषांवर पात्र ठरल्यास लाभार्थ्याला साधारणतः 1.20 लाख रुपये, तर डोंगरी भागात राहणाऱ्यांना 1.30 लाख रुपये मिळत होते.
आता सरकारने या अटी अधिक लवचिक केल्या असून, पात्रतेसाठी काही अटी रद्द करण्यात आल्या आहेत आणि मासिक उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी स्कूटर, दुचाकी किंवा मासेमारीची होडी असणाऱ्यांना अपात्र ठरवले जात होते, परंतु आता हे निकष रद्द करण्यात आले आहेत.
याशिवाय, ज्या नागरिकांना पूर्वी वेळेअभावी किंवा माहितीअभावी सर्वेक्षणात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी सरकारने सर्वेक्षणाची अंतिम तारीख वाढवून 15 मे केली आहे. त्यामुळे आता अधिक पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी 13 अटी पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र आता तीन अटी रद्द करण्यात आल्या आहेत चला तर जाणून घेऊया कोणते आहेत अटी.
पूर्वी लागू असलेले 13 निकष (ज्यापैकी आता फक्त 10 लागू)
1. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे2. घरात 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नसावा3. महिला प्रधान कुटुंब, ज्या घरात कोणताही पुरुष सदस्य नाही4. कुटुंबातील 25 वर्षांवरील सदस्य पूर्णतः अशिक्षित असावेत5. अपंग सदस्य असलेले किंवा कोणताही कार्यक्षम प्रौढ नसलेले कुटुंब6. जमीन नसलेले आणि केवळ मजुरीवर अवलंबून असलेले कुटुंब7. घरात कोणताही वयस्क सदस्य (16-59 वर्षे) नसावा8. संपूर्ण बेघर असणे किंवा फक्त एक खोली असलेले घर9. अनुसूचित जाती, जमाती किंवा अल्पसंख्याक समाजातील कुटुंब10. मासेमारीसाठी होडी किंवा दुचाकी वाहन असलेले कुटुंब (निकालात)11. वीज कनेक्शन नसलेले कुटुंब12. घरात शौचालयाची सुविधा नसलेली कुटुंबे13. घरात स्वयंपाकासाठी गॅस चूल नसणे
कोणते निकष आता रद्द करण्यात आले?
नवीन सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खालील तीन अटी आता विचारात घेतल्या जाणार नाहीत:
1. मासेमारीसाठी होडी असणे किंवा दुचाकी वाहन असणे
2. वीज कनेक्शनची अनुपस्थिती
3. घरात गॅस चूल नसणे
नव्या निकषांमुळे काय बदल झाले?
1. उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली आहे2. वाहन किंवा नाव असणं आता अपात्र ठरण्याचं कारण नाही3. अधिक गरजू लोक योजनेत समाविष्ट होणार4. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक संधी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.