महाबळेश्वर दरे येथे जलतरा प्रकल्पाचे भूमिपूजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण
महाबळेश्वर दरे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या गावी “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” अभियानांतर्गत जलतरा प्रकल्पाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते मा. नाना पाटेकर यांच्या हस्ते जलतरा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
उपमुख्यमंत्री असताना श्री. शिंदे साहेबांनी “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेला चालना देत जलतरा योजनेला मान्यता दिली होती. सदर योजना श्री श्री रविशंकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जात असून मनरेगा (रोजगार हमी योजने) अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला रु. ४८०० इतके अनुदान दिले जात आहे. या शोष खड्ड्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत नैसर्गिकरीत्या साठवले जाते, ज्यामुळे भूजलपातळी वाढते आणि शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा होतो.या प्रसंगी बोलताना मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले,“जलतरा प्रकल्पामुळे नैसर्गिक स्रोतांद्वारे जमिनीत पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात करता येतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.