Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेतला प्रश्न हटवण्यासाठी १० कोटी मागितले, अडीच कोटींवर तडजोड; २० लाखांची लाच घेताना आमदाराला अटक

विधानसभेतला प्रश्न हटवण्यासाठी १० कोटी मागितले, अडीच कोटींवर तडजोड; २० लाखांची लाच घेताना आमदाराला अटक


विधानसभेत खाणकाम संदर्भातील प्रश्न हटवण्याच्या बदल्यात आमदाराने तब्बल १० कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात २० लाख रुपये स्वीकारताना आमदाराला रंगेहाथ पकडण्यात आलंय. राजस्थानच्या बागीदौरा इथला हा आमदार आहे.

भारतीय आदिवासी पार्टीच्या या आमदाराचं नाव जयकृष्ण पटेल असं आहे. एसीबीने त्याला अटक केलीय.

एसीबीचे महासंचालक डॉक्टर रवि प्रकाश मेहरडा यांनी सांगितलं की, खाणकाम व्यावसायिक रविंद्र सिंह यांनी ४ एप्रिलला तक्रार दिली होती की, आमदाराने खाणीशी संबंधित प्रश्न विधानसभेत उपस्थित केले. त्यानंतर ते हटवण्यासाठी १० कोटींची मागणी केली. शेवटी तडजोड करून अडीच कोटी घेण्यास आमदार तयार झाले.

तडजोडीनंतर पहिला हफ्ता आमदाराला एक लाख रुपये रोख देण्यात आला. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पुरावे गोळा केले. पुढचा हफ्ता २० लाख रुपयांचा जयपूरमध्ये आमदाराच्या निवासस्थानीच दिला जाणार होता. त्यादिवशी आमदार स्वत: जयपूरला पोहोचले आणि नोटांनी भरलेली बॅग घेतली. त्यावर त्यांच्या बोटांचे ठसेही आढळून आले आहेत.

आमदाराने लाच घेतल्याचे तांत्रिक पुरावेही एसीबीने सादर केले. तसंच दावा केला की नोटांवर विशेष शाई लावली होती. ऑडिओ, व्हिडीओ आणि फोटोही पुरावे म्हणून आमच्याकडे आहेत. बॅग उचलताना आमदाराच्या बोटांचे ठसे त्यावर असल्याचंही एसीबीने सांगितलं.

दरम्यान, आमदाराच्या वतीने पैसे घेणारा व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे. एसीबीने दावा केलाय की, आमच्याकडे त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग आहे. त्यात पैसे घेऊन जाताना तो दिसतोय. हे प्रकरण आमदाराशी संबंधित असल्यानं विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांची परवानगी घेण्यात आली होती. तसंच या ट्रॅप ऑपरेशनची माहितीही दिली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.