यवतमाळ : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहे. भारतामध्ये असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानी सिलेब्रिटीचे अकाऊंट भारतामध्ये वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक पाकिस्तानी महिला या लग्न करुन भारतामध्ये आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मत मांडले आहे.
यवतमाळमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये झालेल्या विवाहाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,"हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात वसल्या आहेत. भारतात आतंकी कारवाया सफल करण्यासाठी हा मॅरेज जिहाद तर नाही ना असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. तसेच लग्न ही संकल्पना नसून बॉस बॉर्डर टेररिझम असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही, असे देखील सदावर्ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? हे सांगावं. आपण लोकप्रतिनिधी आहात. मात्रं पत्रकारांना भीती घालण्याचं काम करताय. शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला द्यावा, सोयाबीनला साडेसात हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शासनास करतो. पुसद तालुक्याला पुष्पावंती नगरी म्हणून जिल्हा घोषित करावा, अशी आमची भूमिका आहे. या तालुक्याने महाराष्ट्राला नाईकांच्या रुपात दोन मुख्यमंत्री दिले. राज्यमंत्री इंद्रनील नायकांनी स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा. विदर्भातीलच महसूल मंत्री व मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबींचा विचार करायला हवा व पुसद जिल्हा करावा. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हा आमचा दौरा सुरू आहे," मत वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी पुसद येथील दौऱ्या दरम्यान केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.