Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-धावत्या गाडीत जातीयवाद चिघळला! ठाण्याच्या महिलेवर हल्ला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न

मुंबई :- धावत्या गाडीत जातीयवाद चिघळला! ठाण्याच्या महिलेवर हल्ला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न
 

पालघर : हातामध्ये असणाऱ्या रुद्राक्ष माळ व हातावर गोंदविलेल छत्रपती या टॅटू च्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्सप्रेस मध्ये सुरू झालेला वाद चिघळून ठाणा येथील एका महिलेवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलेने व एका सहकारी प्रवाशाने धारदार वस्तूने वार केला. हेल्पलाइनला फोन केल्यानंतर या महिलेला वलसाड येथे उतरवण्यात आले व उपचार केल्यानंतर पालघर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

इंदोर येथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी ठाणा येथील रहिवासी ॲड. शितल शरद भोसले या ३ मे रोजी रात्री अवंतिका एक्सप्रेसमधून सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या. या सामान्य डब्यात बहुतांश सहप्रवासी अल्पसंख्यांक असल्याचे माहिती पीडित महिना हिने दिली आहे. ॲड. शितल भोसले यांच्या हातात असलेली रुद्राक्ष माळ व छत्रपतींचे नाव पाहून शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्याक महिला प्रवासाने वाद-विवाद सुरू झाला.
रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही गाडी सफाळे जवळ आल्यानंतर आरोपी महिलेने आपल्या पर्स मधील आधार कॉर्ड व इतर महत्त्वाची कागदपत्र लपविल्याचे आरोप करीत या ॲड. शितल भोसले यांचा पैजामा खेचून काढण्यात आला. श्रमिती भोसले यांच्याकडे काही न सापडल्याने नंतर यांच्यावर या महिलने हल्ला केला. एका ब्लेड ने गळ्याच्या दिशेने केलेला वार हातावर थोपविल्याने त्यांचा हाताला जखम झाली. दरम्यान एका पुरुष प्रवाशाने चावी द्वारे मानेवर हल्ला केला. ही गाडी वापी स्टेशनला थांबली असताना या पीडित महिलेने फलाटावर असणाऱ्या होमगार्ड याला मदतीसाठी साद घातली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही असे त्या महिलेने पालघर येथे पत्रकारांना सांगितले.

दरम्यान या संदर्भात हल्ला करणाऱ्या महिलेने हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यात आल्याने वलसाड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस आले आणि एकंदर परिस्थिती पाहून त्यांनी पीडित महिलेला तसेच हल्ला करणाऱ्या एक महिला व पुरुष प्रवासाला ताब्यात घेतले. या जखमी महिले च्या हातावर रुग्णालयात आठ टाके घालण्यात आले असून तक्रार नोंदवण्यासाठी तिला आज सकाळी नऊ वाजता पालघर रेल्वे पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले. रेल्वे पोलिसांनी सायंकाळी फिर्याद नोंदविली असून दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणात खून करण्याचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी, हिसकावून चोरी व इतर कलमा अंतर्गत पालघर लोहमार्ग पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांचा बंदोबस्त

या घटनेची माहिती मिळताच हिंदू समाजाशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधी या ठिकाणी गोळा झाले असून रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पालघर शहर पोलिसांची मदत घेण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. फिर्याद नोंदविताना रेल्वे पोलिसांनी अनेक महत्वाच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या न्हवत्या. या बाबत जमलेल्या नागरिकांनी विचारणा केल्यानंतर दोन पुरवणी फिर्याद नोंदविणे पोलिसांना भाग पडले.

वादाची सुरुवात…
“आप ये रुद्राक्ष पेहेनते हो क्या बकवास हैं,” असे सांगितल्यावरून वाद सुरू झाला व पीडित महिलेने, “तुझ्या बरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलं का, मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो” असे बोलाबालीने वादला आरंभ झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.