मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या थांबत नसल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक प्रकरणात करुणा मुंडे यांना वांद्रे कुटुंब न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने करुणा यांची पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी करुणा मुंडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून
मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत
नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये,
यासाठी याचिका दाखल केल्याचं करुणा मुंडे यांनी पुढे म्हटले आहे.
करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश
अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होत नाहीत. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यांचा दावा आहे की, त्या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी आहेत. धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा यांचा खटला काय होता? न्यायालयाने म्हटले की, करुणा शर्मा यांचे संबंध हे 'विवाहाचे स्वरूप' असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आणि घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत करुणा शर्मा यांना दिलासा मिळण्यास पात्र आहे. त्यानुसार, कोर्टाने करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.