Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत, शंकराचार्यांच्या निर्णयाने खळबळ; मनु स्मृतीबाबतचं ते विधान भोवलं?

राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत, शंकराचार्यांच्या निर्णयाने खळबळ; मनु स्मृतीबाबतचं ते विधान भोवलं?
 

कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेत मनुस्मृतीबाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर साधुसंतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. तर आता भडकलेल्या शं‍कराचार्यांनी त्यांना बहिष्कृत केले आहे.

काय म्हणाले शंकराचार्य

ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचे जाहीर केले. आजपासून राहुल गांधी यांना हिंदू धर्माचे मानण्यात येऊ नये, असे शंकराचार्य म्हणाले. राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत वक्तव्य दिले आहे. शं‍कराचार्यांनी गांधी यांच्याकडे या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यांनी त्यांना पत्र सुद्धा पाठवले होते. पण तीन महिने उलटूनही राहुल गांधी यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर शं‍कराचार्यांनी हे कडक पाऊल टाकले. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचे शंकराचार्य यांचे मत आहे. राहुल गांधी म्हणाले होते की मी मनुस्मृती मानत नाही. मी संविधानाला मानतो. त्यावर शंकराचार्य म्हणाले की, प्रत्येक हिंदू आणि सनातन धर्म हा मनुस्मृतीशी संबंधित आहे.

गांधीकडून मनुस्मृतीची बदनामी
शं‍कराचार्यांनी त्यांना पत्र पाठवल्याची आठवण सुद्धा करून दिली होती. पण त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. अनेकांनी राहुल गांधी हे हिंदूच नाही तर त्यांना बहिष्कृत करण्यात काही अर्थ नसल्याचे आपणास सांगितल्याचे शंकराचार्य म्हणाले. त्यानंतर आम्ही असा निष्कर्ष काढला की, राहुल गांधी यांची मनुस्मृतीवर श्रद्धा नाही. ते संसदेत मनुस्मृतीबाबत चुकीची विधान करत आहे. ते मनुस्मृतीला बदनाम करत आहेत. मनुस्मृतीत बलात्कार करणाऱ्यांना संरक्षण देण्याची गोष्ट लिहिली नाही. प्रत्येक हिंदू हा सहमत असो वा नसो तो मनुस्मृतीला एक धार्मिक ग्रंथ म्हणून मानतोच. तुम्ही मनुस्मृतीला तुमचा ग्रंथ मानत नाही, म्हणजे तुम्ही हिंदू नाहीत, असे शंकाराचार्य म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.