Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यप्रेमींची चिंता वाढली! मद्यावरील शुल्क वाढले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मद्यप्रेमींची चिंता वाढली! मद्यावरील शुल्क वाढले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


राज्यातील मद्यप्रेमींसाठी चिंताजनक बातमी आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दिड टक्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. कोणते मद्य आता किती रुपयांना मिळणार ते जाणून घेऊयात.

१८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत

देशी मद्य- 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये
यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून आणखी महसूल वाढणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पदे भरली जाणार

राज्य उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पदे नव्याने भरली जाणार आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई उपनगर, ठाणे ,पुणे ,नाशिक ,नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालये सुरू केली जाणार आहेत. याशिवाय उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम देखील तयारी केली जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठकीतील इतर निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाने माहिती दिली आहे.यामुळे अनुसूचित जातीच्या नागरिकांना फायदा होणार आहे.

त्याचबरोबर राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आठ हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.