Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा

अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा


बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या उत्तम अभिनयासाठी तसेच त्यांच्या कौटुंबिक विचारसरणीसाठी आणि जीवनातील तत्त्वांसाठी ओळखले जातात. अलिकडेच त्यांचा मुलगा ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तसेच अभिनेत्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला अजून चांगली कमाई करत आहे. दरम्यान, आता अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुला-मुलींना समान वागणूक आणि मालमत्तेच्या वाटणीबद्दल उघडपणे सांगितले आहे.

मालमत्तेबद्दल अमिताभ बच्चन यांचे मत
२०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की त्यांनी आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी आधीच ठरवले होते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्यात समान वाटली जाईल. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, “माझ्यानंतर काहीही झाले तरी ते अभिषेक आणि श्वेता यांच्यात समान वाटले जाईल. कोणाविरुद्धही कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.


अमिताभ बच्चन यांचे हे मत आजच्या काळातील विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, जिथे मुले आणि मुलींना समान मानले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की जरी समाज मुलींना “परक्याचे धन” मानतो, तरी ते यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी, श्वेता अभिषेकइतकीच पात्र आहे असे त्यांचे मत आहे.

अमिताभ बच्चन यांची मालमत्ता
जर अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्स आणि इंडिया रिच लिस्टनुसार, बच्चन कुटुंबाकडे सुमारे १६०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे मुंबई, पुणे, पावना आणि अयोध्या सारख्या ठिकाणी मौल्यवान घरे आणि जमिनी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेले त्यांचे जुने घर ‘प्रतीक्षा’ त्यांची मुलगी श्वेताला दिले आहे, ज्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचे मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.