Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयुक्तांच्या निवृत्तीनंतर वाजले फटाके

पुणे :-आयुक्तांच्या निवृत्तीनंतर वाजले फटाके


पुणे : फटाके वाजवून आणि साखर वाटप करून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने पुणेरी पद्धतीने शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. डॉ. भोसले हे गेल्या वर्षापासून महापालिकेत प्रशासक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीत शहरात अनेक निर्णय झाले, मात्र हे निर्णय पुणेकरांवर चुकीच्या पद्धतीने लादले गेल्याची भावना शहरवासियांत निर्माण झाली होती. नालेसफाई, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत बांधकाम व्यावसायिकांना, कंत्राटदारांना प्राधान्य देणारी धोरणे त्यांच्या काळात राबवल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

 
या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फटाके वाजवून आणि साखर वाटप करून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुणेरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. याद्वारे पक्षाने डॉ. भोसले यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत सामान्य पुणेकरांच्या असंतोषाला वाचा फोडली. प्रशासक म्हणून शहराच्या हितासाठी निर्णय घेण्याऐवजी बिल्डरधार्जिणी आणि नागरिकविरोधी धोरणे राबवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निरोपाला आनंदाने शुभेच्छा देणे हीच खरी पुणेरी शैली असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.