Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरीट सोमय्यांची मुजोरी; उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना सूचना, प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

किरीट सोमय्यांची मुजोरी; उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना सूचना, प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न
 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये किरीट सोमय्या हे वर्ध्यातील उपजिल्हाधिरी कार्यालयातील खुर्चीवर बसून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे किरीट सोमय्या हे मंत्री, खासदार, आमदार अशा कोणत्याही प्रकारच्या शासकीय पदावर नाहीत. सोमय्यांच्या एका बाजूला अधिकारी वर्ग आणि समोरच्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री, आमदार, खासदार नसताना देखील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने कामकाज करणे, तिथल्या अधिकाऱ्यांना गोळाकरून त्यांना सूचना करणे म्हणजे एकप्रकारे कायद्यांना हरताळ फासण्यासारखा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. तसेच किरीट सोमय्यांच्या माध्यमातून भाजप प्रशासनावर दबाव टाकून कामे करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे.

किरीट सोमय्यांचा वापर करून, त्यांना विविध जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर पाठवून भाजप प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही शासकीय पदावर नसताना देखील अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरून सूचना करणे म्हणजे एकप्रकारे प्रशासनाला गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. ही हुकूमशाही आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निहाल पांडे यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हाधिकारी खताळे यांनी किरीट सोमय्या हे वर्ध्यात आणि शासकीय कार्यालयात आल्याचे सांगितले. मात्र त्यांनी व्हायरल फोटोवरून होणारे आरोप फेटाळत सोमय्यांची खुर्ची कधी अधिकाऱ्याच्या टेबलजवळ सरकली गेली ते कळालंच नाही असं म्हणत सोमय्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.