Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मर्जीतील अधिकाऱ्यांना इशारा! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई

मर्जीतील अधिकाऱ्यांना इशारा! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई
 

मुंबई: राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून मर्जीतील अधिकाऱ्यांचे सुरु असलेले लाड बंद करण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरए मधील मेहरबान अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई केली असून एसआरएमधील कार्यकारी अभियंता मिलिंद वाणी यांची अखेर जलसंपदा खात्यात गच्छंती करण्या आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मिलींद वाणी हे जलसंपदा खात्यातील मूळ अधिकारी असून देखील जवळपास 17 वर्ष प्रतिनिधीवर बाहेर काम करत आहेत वास्तविक प्रतिनियुक्तीवर पाच ते सात वर्ष काम करणे अपेक्षित आहे पण हे सारे मध्येच वाणी हे तब्बल सात वर्षे कार्यरत असून जलसंपदा विभागाच्या मूळ विभाग सोडून 19 वर्ष इतर विभागात काम करत होते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत एसआरए विभाग येथे अनेक अधिकारी दीर्घकाळ प्रतिनियुक्तीवर आहेत, यामुळे मूळ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहेअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाणी यांची उचल बांगडी केली असून एस आर ए मधून त्यांना थेट विभाग असलेल्या जलसंपदा विभागात जावे लागणार आहे.

गृहनिर्माण विभागांमध्ये विशेषतः एसआरए आणि महाडा मध्ये अनेक इतर विभागातून प्रतिनियुक्तीवर अधिकारी आले आहेत, एकदा आले की ते परत जातच नाहीत अशी स्थिती आहे यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. वाणींसारखे इतर अधिकारी अनेक आहेत की जे प्रतिनियुक्तीवर आले आहेत आणि म्हाडा आणि एस आर ए मध्येच कार्यरत आहे यामुळे अशा लोकांवर देखील कारवाई कधी करणार? असा सवाल आता विचारला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.