Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुहास कांदे यांनी वडिलांचे 72 लाख हडपले! सख्ख्या भावाने दिली जाहीर नोटीस

आमदार सुहास कांदे यांनी वडिलांचे 72 लाख हडपले! सख्ख्या भावाने दिली जाहीर नोटीस
 

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी वडिलांचे 72 लाख रुपये हडपले. वडिलांच्या पश्चात आई व छोटी बहीण यांची कुठलीही जबाबदारी घेतली नाही. सुहास कांदे हे अनेक गैरकृत्यांत गुंतलेले असून त्याचे खापर आमच्यावर फोडत आहेत, अशी जाहीर नोटीसच सख्खा भाऊ गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी दिली आहे.

वर्तमानपत्रात जाहीर नोटिसांमधून आमदार कांदे यांनी भाऊ गुरुदेव कांदे व पुतण्या देवेंद्र हे आपल्या नावाचा गैरवापर करून दादागिरी करतात. तसेच कॉण्ट्रक्टरला धमकावून माघार घेण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला होता. त्याला गुरुदेव कांदे यांनी जाहीर नोटिसीद्वारे उत्तर देत आमदार सुहास कांदे यांच्या गैरकृत्यांचा भंडाफोड केला. वडिलांचे निधन झाल्यानंतर सुहास कांदे यांनी वडील व माझ्या नावे खोटे दस्तऐवज बनविले व खोट्या सह्या केल्याचेही त्यांच्या भावाकडून सांगण्यात आले आहे.

सुहास कांदे यांचे कारनामे
चारचाकी गाड्यांची चोरी करून नंबर प्लेट बदलून विक्री केल्याप्रकरणी सुहास कांदे यांच्याविरुद्ध कांदिवली, जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सुहास कांदे यांनी जिल्हा बँकेच्या नोकरभरतीत खूप मोठा अपहार केलेला आहे. तसेच गिरणा बँकेच्या वसुलीत अपहार केलेला आहे.
सुहास कांदे यांच्या विरोधात 2015चे आसपास बरेच गुन्हे दाखल झाले असून तीन वेळा नाशिक जिह्यातून हद्दपार करण्यात आलेले होते. मोक्काच्या गुह्यात अटक होत असताना वाचले.
हिंदू कायद्याप्रमाणे एक पत्नी करण्याचा अधिकार असताना सुहास कांदे यांनी तीन पत्नी केलेल्या आहेत.
2014 पासून संबंध तोडले

सुहास कांदे यांच्यासोबत 2014 पासून आपण कौटुंबिक संबंध तोडले आहेत. त्यांच्या नावाचा आम्ही कधीही वापर केलेला नाही, उलट त्यांच्या नावाचा आम्हाला त्रासच झालेला आहे, असे गुरुदेव कांदे यांनी नोटिसीत नमूद केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.