मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक बाब सोमवारी विधानसभेत समोर आली. या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न
केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित
केल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी
विधानसभेत केली.
शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. शांता तडवी हिची भावजय सुमित्रा तडवी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळविली, त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही अंगणवाडी तडवी परिवाराच्या घरातच चालत असे. शांताबाईंचे निधन झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिच्या मुलाने तक्रार केली; पण त्या तक्रारीची दखल तर घेतली गेली नाहीच, पण शांताबाईंच्या मृत्यूनंतरही सुमित्रा यांना पगार चालूच ठेवला गेला, असा आरोप पाडवी यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.