ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही."
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणांमधून जात, धर्म, पंथ यांना महत्त्व देत नाही असे सांगितले आहे. तसेच जातीची गोष्ट करणाऱ्यांना गडकरी जुमानत नाहीत हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही त्यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली.
सध्या देशात भाषण वरून वाद सुरू आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषा सुरू करण्यावरून अलीकडेच वाद निर्माण झाला होता. शेवटी राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. तर गृहमंत्री अमित शहा यांनी इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांना लाज वाटेल असे विधान केले होते. मात्र नेहमीप्रमाणेच नितीन गडकरी यांनी स्पष्ट विधान केले आहे.ते काल या कार्यक्रमात म्हणाले की, शिक्षण ही आपली शक्ती आहे. शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. आज अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटी कामे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये चांगली कला कौशल्य असूनही केवळ शिक्षणा अभावी ते मागे पडलेले आहेत. त्यामुळे सगळ्या भाषांचे शिक्षण चांगले शिक्षण घ्यावे असं आव्हान त्यांनी केले. शिक्षण घेत असताना पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला खूप गुण मिळाले म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तसे नाही. मी विधी अभ्यासक्रमात असताना मागच्या बाकावर बसणारे आज मोठे वकील झाले तर गुणवत्ता यादीत आले नाही असेही गडकरी म्हणाले.
ब्राह्मण जातीसंदर्भात नेमके काय म्हणाले गडकरी
गडकरी म्हणाले की, मी स्वत: ब्राह्मण असूनही महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्त्व नाही. इकडे आमची फार चालत नाही. मात्र, उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्त्व आहे. तिकडे दुबे, चतुर्वेदी यांची चलती असते. राजकारणामध्ये त्यांचे प्राबल्य आहे. एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेले असता व्यासपीठाने एकाने सांगितले की, अटल बिहारी यांच्यानंतर आमच्या समाजाती एका नेत्याच्या आम्हाला गर्व आहे. आज गडकरींना संपूर्ण देश ओळखतो, असेही ते म्हणाले. यावर गडकरींनी त्यांना खडसावून सांगितले. मी कुठल्याही जाती, धर्माला मानत नाही. त्यामुळे मी केवळ तुमचा नसून सर्व समाजाचा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.