दिल्लीत मंगळवारी एका २९ वर्षीय महिलेला तिच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. असा आरोप आहे की तिच्या ३२ वर्षीय पतीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली. नंतर पोलिसांनी पत्नीच्या फोनमधील सर्च हिस्ट्री तपासली तेव्हा 'व्यक्तीला मारण्याचे मार्ग' शोधण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फरजाना खान नावाच्या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले की तिने तिचा पती मोहम्मद शाहिद उर्फ इरफानची हत्या केली कारण ती या नात्यावर समाधानी नव्हती.
फरजाना हिने तपासकर्त्यांना असेही सांगितले की शाहिद शारीरिक संबंधा दरम्यान तिला समाधानी करू शकत नव्हता. याशिवाय, तो कर्जबाजारी होता आणि ऑनलाइन बेटिंग करायचा. फरजानाने असेही उघड केले की तिचे त्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पती-पत्नी दोघेही बरेलीचे रहिवासी होते. रविवारी संध्याकाळी, संजय गांधी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीला मृत अवस्थेत आणण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह रुग्णालयात आणणाऱ्या त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले की, शाहिदने कर्जामुळे आत्महत्या केली. परंतु त्याच्या शरीरावर तीन जखमा पाहून पोलिसांना संशय आला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पत्नीने आम्हाला सांगितले की तो जुगाराशी संबंधित कर्जामुळे तणावाखाली होता आणि त्याने स्वतःवर चाकूने वार केले. परंतु सोमवारी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे उघड झाले की ही हत्या होती.संशय वाढत असताना, पोलिसांनी फरजानाचा फोन तपासला. ते म्हणाले, "आम्हाला इंटरनेट सर्च हिस्ट्रीमध्ये 'झोपेच्या गोळ्या देऊन एखाद्याला मारण्याचे मार्ग' शोधण्यात आले. याशिवाय, चॅट हिस्ट्री कशी हटवायची याचा देखील शोध घेण्यात आला." या पुराव्यांसह फरजानाची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला. फरजानाने सांगितले की ती आपल्या लग्नाने समाधानी नव्हती - यामागे दोन मुख्य कारणे होती: शारीरिक संबंधातून अपेक्षित समाधान न मिळणे आणि आर्थिक अडचणी. तिने हेही उघड केले की बरेलीत राहणाऱ्या पतीच्या चुलत भावाशी तिचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी मंगळवारी फरजानाला अटक केली असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.