'माझा मृत्यू झाला तर त्याला नाना पाटेकर जबाबदार' तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप, म्हणाली, 'मला भिती दाखवण्याचा..'
तनुश्री दत्ताने पुन्हा नाना पाटेकरवर गंभीर आरोप केलेत. मृत्यू झाल्यास नाना पाटेकर Enquiry ठरेल, असा ती दावा करतेय. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिला घरात गेल्या अनेक दिवसापासून होणाऱ्या त्रासाबद्दल तिने सांगितलय. यावेळी बोलताना ती ढसा ढसा रडली. 'सुशांत सिंह सोबत काय झालं. तेच
माझ्यासोबत होत आहे. यामागे फक्त नाना पाटेकर नसून अनेक लोक असल्याचा' आरोप
तनुश्री दत्ताने केलाय. तसंच 'माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही. मी
उज्जैनला गेले तिथं ही माझा अपघात झाला. नाना पाटेकर गँगस्टर कुटुंबातून
आलाय. त्यामुळे मी जिथं जाईल तिथं माझा पाठलाग होतोय. प्रत्येक वेळी
वेगवेगळा माणूस माझ्या मागे असतो.' अशी प्रतिक्रिया तिने एबीपी न्युजशी
बोलताना दिली.
एबीपी न्युजला बोलताना तनुश्री म्हणाली की, 'या सगळ्यांना भिती आहे की, मी काहीतरी करेल. त्यामुळे ते मला भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. नाना पाटेकर स्वत: म्हणाला होता की, मी अभिनेता नसतो तर एक गँगस्टर असलो असतो. नाना पाटेकर चांगला माणूस नाही. मला त्रास देण्यामागे अंडरवर्ल्डचा हात आहे. काही लोक माझा फोन, इमेल सुद्धा हॅग करत आहे. माझ्या बँक खात्यातून पैसे सुद्धा काढून टाकण्यात आलेत.' पुढे बोलताना तनुश्री म्हणाली की, 'जर माझा मृत्यू झाला, तर त्याला फक्त नाना पाटेकर जबाबदार असले. गेल्या पाच वर्षापासून मी बरच काही सहन केलय. त्यामुळे मी रडत तो व्हिडिओ बनवला आहे. तसंच दुसऱ्या हिरोईन ज्यापद्धतीने काम करतात. तसं काम मला कारायचं नाहीय.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.