दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळ भाज्या, हंगामी फळे, ड्रायफ्रूट इत्यादी अनेक हेल्दी पदार्थांचे आहारात सेवन केले जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत आणलेल्या भाज्यांमध्ये एखादी कीड तर नक्कीच सापडते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक किडे आढळून येतात. थंडगार वातावरणात कोबीच्या भाजीसाठी अतिशय अनुकूल आहे. पण मागील बऱ्याच वर्षांपासून तुम्ही ऐकले असेल कोबीच्या भाजीमधील किडे मेंदूमध्ये जातात. धक्कादायक गोष्ट म्हणजे कोबीच्या भाजीमध्ये असलेले किडे बऱ्याचदा डोळ्यांना दिसत नाही आणि भाजी शिजल्यानंतर सुद्धा कोबीच्या भाजीमधील किडे नष्ट होत नाहीत. त्यामुळे कोबीच्या भाजीचे सेवन अनेक घरांमध्ये केले जात नाही. मेंदूमध्ये किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टीसर्कोसिस असे म्हंटले जाते.(फोटो सौजन्य - istock)
बाजारातून विकत आणलेली कोबीची भाजी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून शिजवली जाते. पण काही लोक भाजी चुकीच्या पद्धतीने शिजवतात, ज्यामुळे भाजीमध्ये असलेले किडे नष्ट होत नाहीत. याच किड्याना टेपवर्म असे म्हणतात. हे टेपवर्म शरीरात शिरतात, जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पहिल्यांदा पोटात कीडा जातो. त्यानंतर तो आतड्यांमधून ब्लड फ्लोसोबत मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक लोक लहान मुलांसह मोठ्यांना कोबीची भाजी खाण्यास देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोबीमध्ये किडे असतात का? कोबीमधील किडे जीवघेणे आहेत का? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
टेपवर्म म्हणजे काय?
टेपवर्म म्हणजे चपटा आणि परजीवी किडा. हा किडा सामान्य किड्यांपेक्षा अतिशय वेगळा असतो. टेपवर्म प्रामुख्याने आतड्यांमध्ये आढळून येतो. प्राण्यांप्रमाणे माणसांमध्ये सुद्धा आढळून येतो. टेपवर्म पोटात गेल्यानंतर आतड्यांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे उलट्या, थकवा, जुलाब आणि इतर लक्षणे दिसून येतात. शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
मेंदूमध्ये किडे झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे:
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टेपवर्म आतड्यांमध्ये जेव्हा प्रवेश करतात, त्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये सुद्धा शिरतात. ज्यामुळे पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उल्टी, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. ही लक्षणे शरीरात दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भाज्यांमधील किडे रोखण्यासाठी काय करावे?
मेंदूमध्ये किडे होऊ नये यासाठी कोबीची भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यावी. कोबीची भाजी कच्ची खाऊ नये. कोबीमधील जंतू नष्ट करण्यासाठी थाइम, सेज आणि पुदिना सारखी झाडे लावावीत. यामुळे तीव्र वास कमी होण्यास मदत होते. मिरची आणि लसूणचा स्प्रे तयार करून कोबीच्या भाजीवर मारावा. यामुळे कोबीच्या भाजीमधील जंतू नष्ट होतील.
FAQs (संबंधित प्रश्न)
टेपवर्मचे संक्रमण कसे होते?
टेपवर्मचे संक्रमण साधारणपणे दूषित अन्न (जसे की कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस) किंवा पाण्यामुळे होते. तसेच, दूषित माती किंवा प्राण्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्यास देखील टेपवर्मचा संसर्ग होऊ शकतो.
टेपवर्मच्या संसर्गाचे निदान कसे केले जाते?
टेपवर्मच्या संसर्गाचे निदान सामान्यतः मल चाचणीद्वारे केले जाते. डॉक्टर मल (stool) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात आणि त्याद्वारे टेपवर्मची अंडी किंवा टेपवर्मचे भाग शोधले जातात.
टेपवर्मच्या संसर्गावर उपचार काय आहेत?
टेपवर्मच्या संसर्गावर उपचार करणे शक्य आहे. डॉक्टर साधारणपणे प्रिस्क्रिप्शन (prescription) औषधे देतात जे टेपवर्मला मारतात. हे औषध साधारणपणे तोंडी घेतले जाते.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.