मी श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालिका, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली या द्वारे सर्व संचालक मंडळामध्ये विचारपूर्वक एकत्र बसून चर्चा करुन व सर्व मताने जाहीर खुलासा करते कि, मागील कां ही दिवसामध्ये संस्थेबाबत कां ही चर्चा होत होत्या त्याला अनुसरुन आम्ही संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी एकत्र बसून तसेच तक्रारदार यांना ही विश्वासात घेऊन त्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन केले.
आम्ही सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना ठामपणे विश्वास देवू इच्छितो कि, संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे. आणि हे या जाहीर खुलाशाद्वारे आम्ही तसे जाहीर करतो आहे. त्यामुळे यापुढे कोणीही याबाबत आलेले कोणतेही व्हीडीओ किंवा प्रसार माध्यमावर येणाऱ्या कोणत्याही बातमी किंवा तोंडी बातमीने विचलीत होण्याचे कोणतेही कारण नाही. सभासद, ठेवीदारांचा एक आणि एक रुपाया संस्थेकडे सुरक्षित आहे याची ग्वाही मी आणि संस्थेचे सर्व संचालक मिळुन आपणांस देत आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये कां ही गैर समज झाले असल्यास ते काढुन टाकावेत व आपण आजवर ज्या विश्वासाने संस्थेशी व्यवहार व प्रेम करीत आला आहात ते तसेच रहावे ही सर्वांना मनपुर्वक नम्र विनंती.
आपले विश्वासू
श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालिका व सर्व संचालक मंडळ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.