Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लवकरच जेवणासाठी घरी येतो' म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवारून खाडीत उडी

'लवकरच जेवणासाठी घरी येतो' म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवारून खाडीत उडी
 

गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अश्यातच आता अटल सेतूवरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून अद्याप या डॉक्टरचा शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारा डॉक्टर हा जे.जे. रुग्णालयात कार्यरत आहे. डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारतांना एका व्यक्तीने बघितले. त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून कळवले. तेव्हा हा प्रकार उजेडात आला आहे.



पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठत तपास केला आहे. पुलावर चारचाकी आणि मोबाईल मिळाला आहे. यात डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32) असे असे अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. ओंकार कवितके हे जे.जे. रुग्णालयात डॉक्टर पदावर कार्यरत आहेत. ओंकार हे कळंबोली येथील रहिवाशी आहे. सोमवारी रात्री ते अटल सेतूवर आले आणि त्यांनी गाडी थांबवत क्षणात खाडीत उडी मारली. ध्रुवतारा बोटला शोधण्यासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळावरून होंडा अमेझ आणि एक आयफोन मिळालेलं आहे. खाडीमध्ये ओंकार कवितके यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला. याबद्दलही आता पोलीस तपास करत आहे.
आईला केला शेवटचा कॉल, आणि….

डॉक्टर ओंकार भागवत कवितकेने आईला शेवटचा कॉल केला होता. सोमवारी रात्री 9.11 वाजता त्याने आईला लवकरच जेवणासाठी घरी येत असल्याचे सांगितले होते. असे उलवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.