खळबळजनक! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याशी संबंधित एक खळबळजनक आणि तितकीच चिंताजनकही बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात संजीवनी योजनेअंतर्गत तपासणी मोहीम राबवल्यागेल्यानंतर तब्बल १४ हजार ५०० पेक्षाही जास्त महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे दिसली आहेत. संजीवनी योजनेअंतर्गत ८ मार्चपासून
आतापर्यंत एकूण २.९ लाख महिलांचे सर्वेक्षण केले गेले आहे. ज्यामध्ये या
महिलांना कर्करोगाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली होती. यापैकी
१४ हजार ५४२ महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली.
याशिवाय या महिलांची तपासणी आणि चाचणी केली गेली तेव्हा तीन महिलांना गर्भाशयाचा कर्करोग, एकीला स्तनाचा कर्करोग आणि आठजणींना तोंडाचा कर्करोग आढळून आला. ही माहिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच आज विधिमंडळात दिलेली आहे. याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी हेही सांगितले की, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कर्करोग्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या तत्काळ उपचारांसाठी मोहीम सुरू केली आहे. कर्करोगाच्या निदानासाठी ग्रामीण भागात आरोग्य शिबिरं आणि तपासणी आयोजित केली जातात. तसेच, आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.