मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाज्याच्या आत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता अनेकांना प्रश्न पडत आहेत की, एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला का गेले होते? तसेच अमित शाह आणि त्यांच्यात काय चर्चा झाली असावी?
यावरच आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून एक मोठा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘आपल्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने ते दिल्लीला गेले होते. त्यांनी शहांच्या पायावर डोकं ठेवलं, चाफ्याची फुलं ठेवली. पायाला चंदन लावलं. नंतर ते इतर नेत्यांना भेटले. नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार शाह यांच्याकडे केली. नंतर शिंदेंनी शाह यांना एक ऑफर दिली की, मराठी माणसांची एकजुट तुटली नाही तर आपल्याला धोका होईल. मला मुख्यमंत्री केली तर त्यावर उपाय निघेल.मी मुख्यमंत्री झालो तर या सगळ्या गोष्टी मी थांबवतो. त्यावर अमित शहांनी शिंदेंना सांगितलं की, मुख्यमंत्री तर भाजपचाच होईल. त्यानंतर शिंदेंनी सांगितलं की, मी माझ्यासह संपूर्ण गट भाजपमध्ये विलिन व्हायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात. ईडीने फाईल उघडण्यास सुरूवात केली असून, शिंदेंच्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शिंदेनी भाजपला अशी ऑफर दिली असल्याचं संजय राऊत पुढे म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.