Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला
 

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित केला. शहरापासूरन दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमकं काय चालतं?

हा अभ्यासाचा विषय आहे, असं ते म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरु असताना ओ-वाय-ओ नावाच्या हॉटेल्सची चैन तयार झाली आहे. शहराच्या २०-२० किलोमीटर दूर, निर्जन ठिकाणी हे OYO हॉटेल आहेत. मनात शंका आली की हे हॉटेल्स नेमके काय आहेत? तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचं लक्षात आलेलं आहे. मुनगंटीवार पुढे म्हणाले, सरकारने या हॉटेल्सकडे लक्ष द्यावं. या हॉटेल्ससाठी ग्रामपंचायत, नगर परिषद,महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा एक पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे.

संस्कृतीरक्षकांचं सराकर...
''ओ-वाय-ओच्या माध्यमातून वीस-वीस किलोमीटर कुणीही प्रवाशी जाऊन राहात नाही. एखादा प्रवासी तिथे गेला तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे, असं समजावं. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला खूप खर्च येतो. त्या पैशात शहरात चांगली रुम मिळेल.'' असं म्हणत मुनगंटीवार पुढे बोलले की, खरंतर संस्कृती रक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा. गृह राज्यमंत्र्यांनी याची माहिती घ्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.